वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जगभरातील सनदी लेखापालांना ब्रँड इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आवाहन
भारतातील सनदी लेखापाल कंपन्यांनी जागतिक भागीदारी विकसित करावी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या बनावे: गोयल
Posted On:
06 SEP 2022 9:36AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जगभरातील भारतीय सनदी लेखापालांना आवाहन केले की, त्यांनी ब्रँड इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे. ते आज सॅन फ्रान्सिस्को येथे अमेरिकेतील 6 क्षेत्रांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या उद्धाटन समारंभात बोलत होते.
आयसीएआयच्या पदाधिकार्यांनी आपल्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल गोयल यांनी त्यांचे अभिनंदन केले.
118 वर्षांनंतर प्रथमच नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईत होणार्या 21व्या जागतिक सनदी लेखापाल काँग्रेसचा संदर्भ देत गोयल म्हणाले, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कालखंडात याचे आयोजन होण्याचे निश्चित झाले आहे. जगभरातील देशांच्या समुदायात भारताच्या वाढत्या प्रासंगिकतेला मिळाली ही ओळख असल्याचे ते म्हणाले.
आजच्या अस्थिर जगात भारत हे स्थिरतेचे बेट असल्याचे नमूद करून मंत्री म्हणाले की, भारत आज सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे. महागाईवर लक्ष ठेवण्याच्या भारताच्या अथक प्रयत्नांवर भर देत गोयल म्हणाले की, 2014 पासून सरकारने हे सुनिश्चित केले आहे की महागाईवर लक्ष केंद्रित करणे ही भारतीय रिझर्व बँकेची (आरबीआय) प्राथमिकता आहे आणि 2014 पासून भारताचा महागाईचा दर सरासरी 4.5% इतका राहिला, जो स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही 8 वर्षांच्या काळातला सर्वात कमी पातळीवरचा आहे.
जगातील चलनवाढीच्या आजच्या अस्थीर परिस्थितीचा उल्लेख करत मंत्री म्हणाले की, भारत हे गुंतवणुकीसाठी सर्वात पसंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि आज भारत जगाचा सर्वात पसंतीचा भागीदार आहे. जगभरातील नेते आज द्विपक्षीय करारांच्या माध्यमातून भारताबरोबरचे संबंध आणि व्यापार वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातींबरोबरचे भारताचे दोन मुक्त व्यापार करार (FTA) यशस्वी ठरले आहेत तसेच युनायटेड किंगडम बरोबरच्या वाटाघाटी पुढील टप्प्यावर आहेत आणि दिवाळीपर्यंत त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
***
Gopal C/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857097)
Visitor Counter : 174