रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने ऑगस्‍ट 22 मध्‍ये 119.32 दशलक्ष टन ही ऑगस्‍ट महिन्यातील सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली


ऑगस्ट महिन्यात 8.69 दशलक्ष टन इतकी अधिक मालवाहतूक झाली आहे, म्हणजे ऑगस्ट 2021 मधील सर्वोत्तम आकडेवारीपेक्षा 7.86% अधिक

याबरोबरच भारतीय रेल्वेने सलग 24 महिने सर्वोत्तम मासिक मालवाहतुकीची नोंद केली आहे

Posted On: 05 SEP 2022 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2022

 

भारतीय रेल्वेने  ऑगस्ट 2022 मध्ये आतापर्यंतची ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक म्हणजे 119.32  दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात  8.69 दशलक्ष टन इतकी अधिक मालवाहतूक झाली आहे, म्हणजे ऑगस्ट 2021 मधील सर्वोत्तम आकडेवारीपेक्षा 7.86% अधिक वाढ नोंदवली आहे.  त्याच बरोबर  भारतीय रेल्वेने सलग 24 महिने सर्वोत्तम मासिक मालवाहतुक केली आहे.

रेल्वेने  9.2 दशलक्ष टन कोळसा , 0.71 दशलक्ष टन खते , 0.68 दशलक्ष टन उर्वरित इतर वस्तू आणि 0.62 दशलक्ष टन कंटेनर इतकी अधिक मालवाहतूक केली आहे. वाहनांच्या वाहतुकीतील  वाढ हे 2022-23 आर्थिक वर्षातील  मालवाहतुकीचे आणखी एक वैशिष्ट्य असून  2022-23 या आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत 2,206 वाघिणी (रेक्स) मधून वाहतूक करण्यात आली, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ही संख्या 1314  रेक्स होती म्हणजे यात  68%  वाढ झाली आहे.

1 एप्रिल 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत एकूण मालवाहतूक 620.87 दशलक्ष टन झाली असून 2021-22 मधील  562.75 दशलक्ष टनच्या तुलनेत 58.11 दशलक्ष टन म्हणजे ही वाढ  0.32% अधिक आहे.

निव्वळ टन किलोमीटर (नेट टन किलोमीटर) मालवाहतूक ऑगस्ट 21 मधील  63 अब्ज वरून वाढून ऑगस्ट 22 मध्ये 73 अब्ज पर्यंत गेली  आहे. ही वाढ 16 % आहे. पहिल्या पाच महिन्यांत एकत्रित निव्वळ टन किलोमीटर मध्ये 18.29% इतकी वाढ झाली आहे.

उर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या समन्वयाने वीज निर्मिती केंद्रांना  कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेचे निरंतर प्रयत्न हे ऑगस्ट महिन्यातील मालवाहतुकीच्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा  (देशांतर्गत आणि आयात दोन्ही) ऑगस्टमध्ये 10.46 दशलक्ष टनने वाढला असून 44.64 दशलक्ष टन कोळसा वीज केंद्रांना पोहचवण्यात आला , जो गेल्या वर्षी 34.18 दशलक्ष टन होता म्हणजे यात 31%  वाढ झाली आहे.  याचाच अर्थ या  वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत, रेल्वेने  गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 32% पेक्षा जास्त वाढीसह 58.41 दशलक्ष टन पेक्षा  अधिक कोळसा वीज केंद्रांना पोहचवला आहे.

माल-निहाय वाढ दर्शवते की रेल्वेने बहुतांश सर्व प्रकारच्या मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे:

Commodity

Variation (MT)

% variation

Coal

9.20

19.26

Fertilizer

0.71

17.10

Balance Other Goods

0.68

7.69

Containers

0.62

9.39

POL

0.28

7.80

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856826) Visitor Counter : 169