गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज तिरुवनंतपुरम येथे दक्षिण विभागीय परिषदेची 30 वी बैठक संपन्न

Posted On: 03 SEP 2022 6:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज तिरुवनंतपुरम येथे  दक्षिण विभागीय परिषदेची 30 वी बैठक पार पडली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण केरळच्या, नागरिकांनाओणमच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ओणम हा केवळ केरळचाच नाही तर भारतीय संस्कृती मधला एक प्रमुख सण आहे.

Description: Description: C:\Users\user\Desktop\107A0786.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत विभागीय परिषदांचे स्वरूप बदलले आहे आणि त्यांच्या बैठकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 पूर्वी, विभागीय परिषदेच्या  वर्षभरात  सरासरी दोन बैठका होत होत्या, ज्या या सरकारने वाढवून 2.7 केल्या आहेत. स्थायी समित्यांच्या सरासरी 1.4 बैठका असायच्या, त्याही सरकारने जवळपास दुप्पट करून त्याचे प्रमाण 2.75 केले आहे . 2014 पूर्वी, विभागीय परिषदांच्या बैठकीत 43 टक्के समस्या सोडवण्यात आल्या तर 2014 ते 2022 पर्यंत, 555 समस्यांवर चर्चा झाली आणि त्यापैकी 64 टक्के प्रकरणांचा  परस्पर संमतीने निपटारा करण्यात  आला.

Description: Description: C:\Users\user\Desktop\107A0946.JPG

शाह यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांना त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले, ज्यामुळे केवळ त्यांच्या राज्यातील लोकांनाच फायदा होणार नाही तर संपूर्ण दक्षिणेकडील प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल. त्यांनी सर्व राज्य परिषदेच्या सदस्यांना  पाणी वाटपाच्या प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढण्याचेही  आवाहन केले. शाह म्हणाले की, स्थायी समितीच्या 12 व्या बैठकीत एकूण 89 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यापैकी 63 मुद्द्यांवर परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला, ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

Description: Description: C:\Users\user\Desktop\107A0826.JPG

अमित शाह म्हणाले की, गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांच्या समस्येवर अत्यंत कठोरपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व राज्यांमधून NCORD च्या नियमित बैठका घेऊन त्या जिल्हा स्तरावर नेण्यावर त्यांनी भर दिला.

Description: Description: C:\Users\user\Desktop\107A0820.JPG

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856549) Visitor Counter : 184