अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित


ऑगस्ट महिन्यातील जीएसटी महसूल संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 28% अधिक

सलग सहा महिने मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा अधिक

Posted On: 01 SEP 2022 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित झाला असून त्यात केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा हिस्सा 24,710 कोटी रुपये आहे, राज्यांचा वस्तू आणि सेवा कर एसजीएसटीचा हिस्सा 30,951 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा 77,782 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 42,067 कोटीं रुपयांसह) आहे आणि उपकराच्या माध्यमातून 10,168 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 1,018 कोटी रुपयांसह) महसूल प्राप्त झाला आहे.

सरकारने ठरल्याप्रमाणे आयजीएसटीमधून सीजीएसटीला 29,524 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 25,119 कोटी रुपये चुकते केले आहेत. नियमित समझोत्यानंतर , ऑगस्ट 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 54,234 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 56,070 कोटी रुपये इतका आहे.

ऑगस्ट 2022 मधील जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील 1,12,020 कोटी रुपये जीएसटी महसुलाच्या तुलनेत 28% इतका अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 57% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 19% जास्त आहे.

गेले सलग सहा महिने, मासिक जीएसटी महसूल संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ऑगस्ट 2022 पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 33% इतकी वाढ झाली असून ही वाढ मोठ्या प्रमाणात उत्साहवर्धक आहे. अधिक चांगल्या प्रकारे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी जीएसटी परिषदेने मागील काळात केलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम आहे.जीएसएसटी संकलनाच्या उत्तम नोंदीसह अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा सकारात्मक परिणाम जीएसटी महसुलावर सातत्यपूर्ण आधारावर दिसून येत आहे. जुलै 2022 मध्ये 7.6 कोटी ई-वे देयकांची निर्मिती झाली, जी जुलै 2022 मधील 6.4 कोटी देयकांच्या तुलनेत 19 % अधिक आहे.

ऑगस्ट महिन्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रात 18,863 कोटी रुपये इतके झाले असून गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात 24% वाढ नोंदवण्यात आली.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. ऑगस्ट 2021 च्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी तक्त्यात देण्यात आली आहे.

 

State-wise growth of GST Revenues during August 2022

State

Aug-21

Aug-22

Growth

Jammu and Kashmir

392

434

11%

Himachal Pradesh

704

709

1%

Punjab

1,414

1,651

17%

Chandigarh

144

179

24%

Uttarakhand

1,089

1,094

0%

Haryana

5,618

6,772

21%

Delhi

3,605

4,349

21%

Rajasthan

3,049

3,341

10%

Uttar Pradesh

5,946

6,781

14%

Bihar

1,037

1,271

23%

Sikkim

219

247

13%

Arunachal Pradesh

53

59

11%

Nagaland

32

38

18%

Manipur

45

35

-22%

Mizoram

16

28

78%

Tripura

56

56

0%

Meghalaya

119

147

23%

Assam

959

1,055

10%

West Bengal

3,678

4,600

25%

Jharkhand

2,166

2,595

20%

Odisha

3,317

3,884

17%

Chhattisgarh

2,391

2,442

2%

Madhya Pradesh

2,438

2,814

15%

Gujarat

7,556

8,684

15%

Daman and Diu

1

1

4%

Dadra and Nagar Haveli

254

310

22%

Maharashtra

15,175

18,863

24%

Karnataka

7,429

9,583

29%

Goa

285

376

32%

Lakshadweep

1

0

-73%

Kerala

1,612

2,036

26%

Tamil Nadu

7,060

8,386

19%

Puducherry

156

200

28%

Andaman and Nicobar Islands

20

16

-21%

Telangana

3,526

3,871

10%

Andhra Pradesh

2,591

3,173

22%

Ladakh

14

19

34%

Other Territory

109

224

106%

Center Jurisdiction

214

205

-4%

Grand Total

84,490

1,00,526

19%

 

1]Does not include GST on import of goods

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856030) Visitor Counter : 239