आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 211.91 कोटी मात्रांचा टप्पा पार केला.


12 ते 14 वर्षे वयोगटातील 4.02 कोटींहून जास्त बालकांना मिळाली लसीची पहिली मात्रा .

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 84,931.

गेल्या 24 तासांत आढळले 7591 नवे रुग्ण.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.62 %

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.69 %

Posted On: 29 AUG 2022 9:28AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 211.91 कोटी ( 2,11,91,05,738 ) मात्रांचा टप्पा पार केला. 


देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2000 22 रोजी सुरू झाली. आतापर्यंत  4.02 कोटीहून जास्त (4,02,61,326) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,970

2nd Dose

1,01,05,765

Precaution Dose

67,33,809

FLWs

1st Dose

1,84,34,398

2nd Dose

1,76,97,177

Precaution Dose

1,31,01,103

Age Group 12-14 years

1st Dose

4,02,61,326

2nd Dose

3,00,87,516

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,55,287

2nd Dose

5,22,70,829

Age Group 18-44 years

1st Dose

56,05,30,020

2nd Dose

51,28,77,344

Precaution Dose

6,01,53,007

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,93,965

2nd Dose

19,62,68,368

Precaution Dose

3,39,72,870

Over 60 years

1st Dose

12,75,73,885

2nd Dose

12,26,78,451

Precaution Dose

4,03,96,648

Precaution Dose

15,43,57,437

Total

2,11,91,05,738

 


भारतात उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 84,931 इतकी आहे. ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.19 % इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0021PV7.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.62 % झाला आहे. गेल्या 24 तासात 9,206 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,38,02,993 झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003SCFH.jpg


गेल्या 24 तासात  कोरोनाचे नवे 7,591 रुग्ण आढळले.


गेल्या 24 तासात एकूण 1,65,751 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.52 कोटींहून अधिक (88,52,08,552) चाचण्या केल्या आहेत.


देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.69 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.58 % आहे.

***

Renu.G/Dr. Shraddhamukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855175) Visitor Counter : 178