खाण मंत्रालय

जून 2022 मध्ये खनिज उत्पादनात 7.5 टक्के वाढ नोंदवली गेली


एप्रिल-जून, 2022-23 दरम्यान एकूण वाढ 9 टक्क्यांवर पोहोचली

महत्त्वपूर्ण खनिज उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली

Posted On: 20 AUG 2022 3:27PM by PIB Mumbai

 

जून, 2022 (आधार: 2011-12=100) महिन्यासाठी खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 113.4 इतका होता तो, जून, 2021 मधील पातळीच्या तुलनेत 7.5% जास्त होता. इंडियन ब्युरो ऑफ माईन्स (IBM) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून, 2022-23 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण वाढ 9.0 टक्क्यांनी वाढली आहे.

जून 2022 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी होती: कोळसा 669 लाख टन, लिग्नाइट 46 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2747 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (कच्चे) 24 लाख टन, बॉक्साइट 1950 हजार टन, क्रोमाईट 343 हजार टन, कॉपर(तांबे) कॉन्क. 10 हजार टन, सोने 85 किलो, लोह खनिज 201 लाख टन, लीड(शीसे) कॉन्क. 30 हजार टन, मॅंगनीज धातू 238 हजार टन, झिंक कॉंक.142 हजार टन, चुनखडी 335 लाख टन, फॉस्फोराईट 189 हजार टन, मॅग्नेसाइट 8 हजार टन आणि डायमंड 44 कॅरेट.

जून, 2021 च्या तुलनेत जून, 2022 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: डायमंड (340%), सोने (107.3%), फॉस्फोराईट (41.0%), कोळसा (31.1%), लिग्नाइट (28.8%), जस्त  (सघन) (20.0%), मॅंगनीज धातू 19.3%), मॅग्नेसाइट (16.6%), बॉक्साइट (8.9%), क्रोमाईट (6.5%), शिसे (4.2%), चुनखडी (1.6%), आणि नैसर्गिक वायू (U) (1.3%) ). नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: पेट्रोलियम (कच्चे) (-1.7%), तांबे सघन (-7.2%), आणि लोह खनिज(-9.7%).

***

R.Aghor/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853308) Visitor Counter : 159