विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय वाहतूक क्षेत्राशी निगडित आंतरराष्ट्रीय परिवहन मंचाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील करारावरील स्वाक्षरीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2022 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2022
आंतरराष्ट्रीय परिवहन मंचाच्या वतीने (ITF) फ्रान्सची ऑर्गनायझेशन फॉर इकनॉमिक कोऑपरेशन ॲण्ड डेव्हलपमेंट आणि तंत्रज्ञान माहिती, पूर्वानुमान आणि मूल्यांकन परिषद (TIFAC) यांच्यात झालेल्या करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या देण्यात आली. भारतीय वाहतूक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय परिवहन मंचाच्या (ITF) उपक्रमांना भारत पाठिंबा देईल.
या करारावर 6 जुलै 2022 रोजी करारावर स्वाक्षरी झाली.
या करारा अंतर्गत साध्य होणाऱ्या बाबी:
- नवीन वैज्ञानिक परिणाम;
- नवीन धोरण अंतर्दृष्टी;
- वैज्ञानिक संवाद वाढवून क्षमता बांधणी
- भारतातील वाहतूक क्षेत्र कार्बन उत्सर्जनापासून मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचे पर्याय शोधणे.
* * *
S.Kakade/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1852601)
आगंतुक पटल : 135