पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शेअर बाजारातील प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2022 10:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजारातील प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, राकेश झुनझुनवाला हे अदम्य साहसी होते. भरभरुन जगणारे, नर्म विनोदी आणि व्यापाराची अत्यंत अचूक समज असणारे असे होते. आर्थिक जगताला त्यांनी दिलेले योगदान हे कधीही पुसून टाकता न येणारे आहे. भारताच्या प्रगतीबाबतही त्यांना अत्यंत कळकळ होती. त्यांचे निधन हे दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.
***
S.Thakur/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851682)
आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam