युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग असलेल्या नवी दिल्लीतील युवा संवाद मेळावा “India@2047” मध्ये धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांचे मार्गदर्शन
तरुणांना त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात 750 युवा संवाद कार्यक्रम आयोजित केले जातील : अनुराग ठाकूर
Posted On:
12 AUG 2022 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत युवा संवाद “India@2047” या कार्यक्रमाला संबोधित केले. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक हे देखील यावेळी उपस्थित होते. मुष्टियुद्धपटू निखत झरीन, रेसवॉकर प्रियांका गोस्वामी, भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर खेळाडू पी.आर.श्रीजेश, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा आणि प्रेरक वक्त्या आभा मर्यादा बॅनर्जी यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. युवा व्यवहार विभागाचे सचिव संजय कुमार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हजारों वर्षांच्या आपल्या इतिहासात आपल्या युवा शक्तीने आपल्या देशाचे भाग्य घडवण्यात पुढाकार घेतला आहे, असे प्रधान यावेळी म्हणाले.
शहीद भगतसिंग, शहीद बाजी राउत, राणी गैडिनलिऊ आणि इतर असंख्य त्यांच्या सारख्यांनी आपल्याला प्रेरणा दिली आणि त्यांच्या तरुण वयात आघाडीचे नेतृत्व केले, असे त्यांनी पुढे नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की युवा वर्ग हेच इंजिन आहे जे देशाला पुढे नेत आहे, आता अमृत काळ सुरू असताना देशाला यशाच्या शिखराकडे नेणे हे आपल्या तरुणांचे कर्तव्य आहे. अमृत काळात तरुणांनी अमृत ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जबाबदारीने त्यांची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत असे अनुराग ठाकूर म्हणाले.
देशभरात अगदी तळागाळापर्यंत तरुणांना राष्ट्रीय आणि विविध विषयांवर त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात युवक व्यवहार विभाग 750 युवा संवाद कार्यक्रम आयोजित करेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
मेळाव्याला संबोधित करताना निशिथ प्रामाणिक यांनी राष्ट्र उभारणीत तरुणांच्या सहभागाची गरज आहे या मुद्द्यावर भर दिला. कोविड महामारीच्या काळात नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी फ्रंट-लाइन योद्धा म्हणून भूमिका बजावल्याबद्दल प्रामाणिक यांनी कौतुक केले. संवाद सत्रात बॉक्सर निखत जरीन, रेसवॉकर प्रियांका गोस्वामी, भारतीय हॉकी संघातील खेळाडू पी.आर.श्रीजेश, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा आणि प्रेरक वक्त्या आभा मर्यादा बॅनर्जी यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अनुराग ठाकूर यांनी तरुण सहभागींशीही संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851402)
Visitor Counter : 192