भारतीय निवडणूक आयोग

"आपल्या निवडणुका सर्वसमावेशक, सुगम्य आणि सहभागात्मक बनवणे" या विषयावर निवडणूक आयोग आयोजित करणार आशियाई प्रादेशिक मंचाची आभासी बैठक


मेक्सिकोच्या नॅशनल इलेक्टोरल इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित "लोकशाहीसाठी जागतिक शिखर परिषद" या बैठकीपूर्वी आशियाई प्रादेशिक मंचाकडून या पूर्व बैठकीचे आयोजन

लोकशाहीसाठी जागतिक शिखर परिषदेचा एक भाग म्हणून अमेरिका, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व यासाठी पाच प्रादेशिक मंचांची स्थापना

Posted On: 10 AUG 2022 11:56AM by PIB Mumbai

भारतीय निवडणूक आयोगाने 11 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक भवन येथे  "आपल्या निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागात्मक  बनवणे" या विषयावर आशियाई प्रादेशिक मंचाची बैठक आभासी पद्धतीने आयोजित केले आहे.  येत्या महिन्यात मेक्सिकोच्या नॅशनल इलेक्टोरल इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या ""लोकशाहीसाठी जागतिक शिखर परिषदे' पूर्वी आयोजित करण्यात येणारी  ही प्रादेशिक मंचाची  बैठक आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, जगातील निवडणूक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि जगातील निवडणूक लोकशाही बळकट करण्यासाठी बौद्धिक आणि संस्थात्मक एकत्रीकरणाला  प्रोत्साहन देणे हे जागतिक शिखर परिषद आणि प्रादेशिक मंचाचे उद्दीष्ट आहे.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे या आशियाई प्रादेशिक मंचाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत मेक्सिको, मॉरिशस, फिलीपाईन्स, नेपाळ, उझबेकिस्तान, मालदीवच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था(आयडीईए), जागतिक निवडणूक संस्थांची संघटना (ए -डब्ल्यूईबी ) आणि निवडणूक प्रणालीसाठीचे आंतरराष्ट्रीय फाउंडेशनचे (आयएफईएस ) प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या आशियाई प्रादेशिक मंचाच्या  (एआरएफ ) बैठकीत दोन सत्रे होणार आहेत. ‘सर्वसमावेशक निवडणुका: दुर्गम भागातील युवक, लिंगभेद दूर करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे’ या विषयावर पहिले सत्र होणार असून मॉरिशस आणि नेपाळचे मुख्य निवडणूक आयुक्त या सत्राचे सह- अध्यक्ष असतील. या सत्रात फिलीपिन्सच्या निवडणूक आयोगाचे (COMELEC) प्रतिनिधित्व असेल आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था (आयडीईए) आणि जागतिक निवडणूक संस्थांच्या संघटनेचे (ए -डब्ल्यूईबी) प्रतिनिधी असतील.

''सुगम्य निवडणुका: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढवणे’ या विषयावर दुसरे सत्र होणार असून फिलीपाईन्सचे निवडणूक आयुक्त आणि उझबेकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त या सत्राचे अध्यक्ष असतील आणि नेपाळ आणि मालदीवच्या निवडणूक आयोगाचे आणि (आयएफईएस) निवडणूक प्रणाली  आंतरराष्ट्रीय फाउंडेशनचे  (आशिया विभाग) प्रतिनिधित्व या दुसऱ्या सत्रात असेल.

या ‘लोकशाहीसाठी जागतिक शिखर परिषद ’चा एक भाग म्हणून आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप आणि अरब देश असे पाच प्रादेशिक मंच तयार करण्यात आले आहेत. जगातील निवडणूक संस्थांमध्ये संस्थात्मक एकत्रीकरणाला प्रोत्साहन देणे केवळ यासाठीच  नाही तर बदलती  भू-राजकीय स्थिती,  उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कोविड-19 महामारीने उपस्थित केलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर यावर विचारविनिमय करण्याच्या अनुषंगाने, भारत निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या आशियाई प्रादेशिक मंचाच्या बैठकीचे आयोजन करत आहे. प्रादेशिक मंचाच्या बैठकीतून निघणाऱ्या निष्कर्षांच्या माध्यमातून  जगभरातील लोकशाही बळकट करण्यासाठी, विशेषतः बळकट निवडणूक प्रक्रियेद्वारे कृती योजना आणि अजेंडा तयार करणे हे या प्रादेशिक मंचाच्या बैठकीचे उद्दीष्ट आहे. आत्तापर्यंत, युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेसाठीच्या तीन प्रादेशिक मंचाच्या बैठका झाल्या असून त्या जून आणि जुलै, 2022 मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.

***

S.Thakur/S.Chavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850460) Visitor Counter : 175