पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 8:20AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 08 ऑगस्ट 2022
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“क्रिकेट हा खेळ आणि भारत यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. आपल्या महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तम खेळ केला आणि देशासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे रौप्य पदक पटकाविले. राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटमध्ये आपण मिळविलेले हे पहिलेच पदक असल्यामुळे ते आपल्यासाठी नेहमीच खूप खास असेल. आपल्या महिला क्रिकेट संघातील सर्व सदस्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा.”
****
SonalT/SanjanaC/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849655)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam