माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सत्येंद्र प्रकाश यांनी पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 01 AUG 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022


सत्येंद्र प्रकाश यांनी आज पत्र सूचना कार्यालयाचे  प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.  प्रकाश हे 1988 च्या तुकडीचे भारतीय माहिती सेवेतील  अधिकारी आहेत. याआधी त्यांनी केंद्रीय संचार विभागाचे प्रधान महासंचालक म्हणून काम केले आहे.

सत्येंद्र प्रकाश यांना केंद्र सरकारमध्ये सार्वजनिक संप्रेषण, माध्यम व्यवस्थापन, प्रशासन, धोरण निर्मिती  आणि कार्यक्रम अंमलबजावणी या क्षेत्रांमध्ये कामाचा विपुल अनुंभव  आहे. युनेस्को, युनिसेफ, यूएनडीपी सारख्या  विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. सरकारी जाहिराती, इंटरनेट आणि डिजिटल मीडिया धोरण, एफएम रेडिओ धोरण, डिजिटल सिनेमा धोरण इत्यादींच्या आशय  नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याच्या आखणीत  त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2021 मध्ये प्रजासत्ताक दिनी व्होकल फॉर लोकल या संकल्पनेवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पहिल्या चित्ररथाच्या सादरीकरणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

प्रकाश हे भारत सरकारच्या अनेक मोठ्या सार्वजनिक अभियानांशी , संपर्क अभियानाची  रचना आणि अंमलबजावणीशी  जोडलेले आहेत.  महत्त्वाच्या आयईसी मोहिमांच्या आखणीचे श्रेय त्यांना जाते. 2021-22 मध्ये मतदार जागरूकता आणि शिक्षणाद्वारे निवडणुकीतील सहभाग वाढवल्याबद्दल त्यांना अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे.

सत्येंद्र प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्र सूचना कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847106) Visitor Counter : 285