आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 202 कोटी 79 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 86 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पाहिली मात्रा देण्यात आली

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,45,026

गेल्या 24 तासात देशात 18,313 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.47%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.57% आहे

Posted On: 27 JUL 2022 3:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2022


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 202.79 कोटींचा (2,02,79,61,722) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,68,10,586 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 86 लाखांहून अधिक (3,86,74,262) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10411302

2nd Dose

10087674

Precaution Dose

6219109

FLWs

1st Dose

18429788

2nd Dose

17666785

Precaution Dose

11958818

Age Group 12-14 years

1st Dose

38674262

2nd Dose

27320571

Age Group 15-18 years

1st Dose

61068357

2nd Dose

50723244

Age Group 18-44 years

1st Dose

559348121

2nd Dose

508014033

Precaution Dose

16910501

Age Group 45-59 years

1st Dose

203655603

2nd Dose

195104198

Precaution Dose

11928700

Over 60 years

1st Dose

127420785

2nd Dose

121920445

Precaution Dose

31099426

Precaution Dose

7,81,16,554

Total

2,02,79,61,722

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,45,026 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.33% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.47% झाला आहे. गेल्या 24 तासात 20,742 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,32,67,571 झाली आहे.

गेल्या 24 तासात, देशात नव्या 18,313 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,25,337 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 36 लाखांहून अधिक (87,36,11,254) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.57% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.31% इतका नोंदला गेला आहे.

 

* * *

S.Tupe/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845357) Visitor Counter : 103