पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ फलदायी ठरो अशा पंतप्रधानांच्या शुभेच्छा
Posted On:
25 JUL 2022 2:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ फलदायी ठरो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाचा पदभार सांभाळणे हा भारतीयांसाठी विशेषतः गरीब, वंचित आणि तळागाळातल्या जनतेसाठी एक निर्णायक ऐतिहासिक क्षण आहे, असं ते म्हणाले. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशानं मिळवलेल्या यशाचा आणि कर्तृत्वाचा उल्लेख केला आणि भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पुढील वाटचालीचा भविष्यवादी दृष्टिकोन सादर केला, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे:
"भारताच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी समारंभ संपूर्ण देशांनी मोठ्या अभिमानाने पहिला. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाचा पदभार सांभाळणे हा भारतीयांसाठी विशेषतः गरीब, वंचित आणि तळागाळातल्या जनतेसाठी एक निर्णायक ऐतिहासिक क्षण आहे, त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ फलदायी ठरो अशा शुभेच्छा देतो."
“राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी आशा आणि करुणेचा संदेश दिला. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांनी भारताच्या कर्तृत्वावर भर दिला आणि पुढील वाटचालीचा भविष्यवादी दृष्टिकोन सादर केला."
* * *
S.Tupe/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844595)
Visitor Counter : 271
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam