भारतीय निवडणूक आयोग

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान संपन्न


एकूण 4,796 मतदारांपैकी 99 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted On: 18 JUL 2022 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022

 

देशातील सर्वोच्च घटनात्मक पद असलेल्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी आज  शांततेत आणि मुक्त, पारदर्शक तसेच निर्भय वातावरणात मतदान संपन्न झाले. संसद भवन परिसर आणि राज्य विधानमंडळ, दिल्ली आणि पुददूचेरीच्या विधानसभा अशा तीस मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक देशातल्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकांपैकी एक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये, भारतीय निवडणूक आयोग ही निवडणूक प्रक्रिया पार पाडतात. यंदा, म्हणजे वर्ष 2022 सालच्या 16 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात होते. श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि श्री यशवंत सिन्हा. निवडणुकीसाठी, 31 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान झाले.

या निवडणुकीत, राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराला एकूण 4796 मतदारांनी मतदान करणे अपेक्षित होते.

सर्व संसद सदस्य- म्हणजे खासदारांनी नवी दिल्लीत मतदान केले तर सर्व विधीमंडळ सदस्य-म्हणजे आमदारांनी ( यात दिल्ली आणि पुददूचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या मतदारांचाही समावेश) आपापल्या विधीमंडळ परिसरातील मतदान केंद्रात मतदान केले. त्यासोबतच, कोणत्या खासदारांना किंवा आमदारांना काही कारणाने आपल्या नियोजित राज्याबाहेर अथवा दिल्लीबाहेर इतर ठिकाणी मतदान करायचे असल्यास, त्याची व्यवस्थाही निवडणूक आयोगाने केली होती.

  

मतदानाविषयी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, संसदेच्या एकूण 771 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यापैकी पांच जागा सध्या रिक्त आहेत. तसेच, राज्य विधानमंडळातील 4025 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्यापैकी 6 जागा रिक्त असून 2 आमदार अपात्र ठरले आहेत.  हे वगळता, 99% मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, माणिपूर, मिझोराम, पुददूचेरी, सिक्कीम आणि तामीळनाडू या ठिकाणी 100 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

मतमोजणी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842514) Visitor Counter : 268