पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या पी व्ही सिंधूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2022 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022

 

सिंगापूर खुली  बॅडमिंटन स्पर्धा  जिंकत या  स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले;

"सिंगापूर  बॅडमिंटन स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद पटकवल्याबद्दल @Pvsindhu1 चे  मी अभिनंदन करतो. तिने पुन्हा एकदा तिचे असाधारण क्रीडा कौशल्य दाखवून यश संपादन केले आहे. हा देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि यामुळे उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल"

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1842190) आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam