पंतप्रधान कार्यालय
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा दोनशे कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
17 JUL 2022 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानावर विश्वास दाखविल्याबद्दल आणि कोविड 19 प्रतिबंधक लस मात्रांचा 200 कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टर परिचारिका, वैज्ञानिक, पहील्या फळीतले कार्यकर्ते,संशोधक आणि उद्योजकांचे देखील अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधानांनी आपलं मनोगत सामायिक केले.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतात, भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. कोविड प्रतिबंधक लस मात्रांचा 200 कोटींचा विशेष टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन. भारताची लसीकरण मोहीम इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल मला अभिमान वाटतो. या लसीकरण मोहिमेमुळे कोविड -19 विरोधातला जागतिक लढा आणखी मजबूत व्हायला मदत होईल.
संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत देशवासीयांनी विज्ञानावर आपला विश्वास दाखवला. आपले डॉक्टर, परिचारिका, पहिल्या फळीतले कर्मचारी, वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक यांनी सुरक्षित भूमी ठेवण्यात मोठे योगदान दिले.मी त्यांच्या धैर्याचं आणि अथक परिश्रमाचे कौतुक करतो.
* * *
Jaydevi PS/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842181)
Visitor Counter : 353
Read this release in:
Malayalam
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia