इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

MyGov गुजरात- 18 व्या उपक्रमाचा आज आरंभ


हे व्यासपीठ 6.67 कोटी गुजरातींना राष्ट्र उभारणीसाठी आणखी योगदान देण्याकरता सक्षम करेल

Posted On: 06 JUL 2022 11:29AM by PIB Mumbai

MyGov गुजरात- 18 व्या उपक्रमाचा आज प्रारंभ झाला.

 

4 प्रमुख उद्दिष्टांसह हा नागरिक केंद्रित मंच सुरू करण्यात आला आहे -

 

1.  पावसाचे पाणी वाचवणे आणि पाणी बचतीचे उपाय सामायिक करणे यावर चर्चा मंच.

 

2.  ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून जीवनमान सुलभतेवर चर्चा मंच.

 

3.  स्वच्छता अभियानावर मतदान.

 

4.  डिजिटल सेवा सेतू वर ब्लॉग.

 

MyGov गुजरात मंच 6.67 कोटी गुजरातींना राष्ट्र उभारणीत आणखी योगदान देण्यासाठी सक्षम करेल.

सरकारला सर्वसामान्यांच्या जवळ आणण्याच्या कल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 जुलै 2014 रोजी जगातील सर्वात मोठा, नागरिकांचा सहभाग मंच असलेले MyGov सुरु करण्यात आले. नागरीकांना आपल्या सूचना आणि कल्पना मांडण्याचे तसेच प्रशासनाच्या कार्यात सहभागी होण्याचे वास्तव प्रदान करण्याच्या रुपात MyGov मंच विकसित झाला आहे. 

आज, MyGov मंचावर 2.5 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत –  यात MyGovSaathis (मायजिओव्ही साथी) यांचा समावेश आहे. ते विविध धोरणात्मक मुद्द्यांवर सक्रियपणे कल्पना आणि सूचना सामायिक करतात. प्रश्नमंजुषा स्पर्धा, हॅकेथॉन, सरकारी योजना तसेच कार्यक्रमांशी संबंधित स्पर्धा यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये देखील भाग घेतात.

भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या जवळपास सर्व समाज माध्यमांवरही MyGovची उपस्थिती आहे. त्यांनी कोविड दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली, योग्य आणि वेळेवर माहिती प्रसारित करून MyGov.in ला पाठिंबा दिला.

आपला स्वदेशी चॅटबॉट, MyGov हेल्पडेस्क, तरुण आणि वृद्ध दोघांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. कोविन आणि अलिकडच्या, डिजिलॉकर अ‍ॅपसह अनेक सरकारी सेवांसह ते एकत्रित केले आहे.

"डिजिटल इंडियाने तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवून लोकांना सक्षम केले आहे."  पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी केलेले हे विधान यामुळे सार्थ ठरत आहे.

 

****

S.Thakur/V.Ghode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1839557) Visitor Counter : 163