रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वाहनांच्या चाकांच्या टायरचा टायर रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड यांच्याकरिता अधिसूचना जारी

Posted On: 01 JUL 2022 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 जून 2022 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 95 मध्ये सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना  जारी केली. या नव्या सुधारणेनुसार, वाहनांमधील सी 1 (प्रवासी कार), सी2(हलक्या वजनाचे ट्रक) आणि सी3(ट्रक आणि बस) या श्रेणीतील टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्स यांचा दर्जा ऑटोमोटिव्ह उद्योग मानके 142:2019 मध्ये निश्चित केल्यानुसार असणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपरोल्लेखित टायर्सनी वेट ग्रिप बाबतच्या अटी आणि रोलिंग रेझिस्टन्स तसेच रोलिंग साऊंड एमिशन्स यांच्या बाबतीत टप्पा - 2 ची मर्यादा पाळणे आवश्यक करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे, भारतातील संदर्भित नियम संयुक्त राष्ट्रांच्या युरोपसाठीच्या  आर्थिक आयोगाच्या नियमांना अनुरूप होतील.  

वाहनाच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स हा इंधनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो; वेट ग्रिपची कामगिरी वाहन ओल्या रस्त्यांवर प्रवास करताना त्या वाहनाच्या ब्रेकच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पाडते  आणि वाहनांची सुरक्षितता वाढविते. रोलिंग साऊंड एमिशन्स म्हणजे वाहन रस्त्यावरून जात असताना त्याचे टायर आणि रस्त्याचा पृष्ठभाग यांच्यातील संपर्कामुळे होणाऱ्या आवाजाचे उत्सर्जन होय.

राजपत्रित अधिसूचनेसाठी कृपया येथे क्लिक करा


* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838526) Visitor Counter : 172