पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांचे केले अभिनंदन
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांचे देखील केले अभिनंदन
Posted On:
30 JUN 2022 8:32PM by PIB Mumbai
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
अभिनंदनपर ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले :
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेंकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळविषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा मला विश्वास आहे.’
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांचे देखील अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले :
‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे.’
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838348)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada