आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 197.46 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.65 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना दिली लसीची पहिली मात्रा

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 99,602

गेल्या 24 तासात 14,506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.56%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.30%

Posted On: 29 JUN 2022 9:19AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 197.46 (1,97,46,57,138) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,56,78,429 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.65 (3,65,66,839) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,865

2nd Dose

1,00,63,714

Precaution Dose

56,74,404

FLWs

1st Dose

1,84,23,695

2nd Dose

1,76,24,541

Precaution Dose

1,01,84,018

Age Group 12-14 years

1st Dose

3,65,66,839

2nd Dose

2,31,73,832

Age Group 15-18 years

1st Dose

6,03,93,817

2nd Dose

4,86,59,660

Age Group 18-44 years

1st Dose

55,82,10,651

2nd Dose

50,10,51,145

Precaution Dose

28,47,482

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,39,243

2nd Dose

19,33,81,568

Precaution Dose

25,18,721

Over 60 years

1st Dose

12,72,50,798

2nd Dose

12,07,79,041

Precaution Dose

2,40,05,104

Precaution Dose

4,52,29,729

Total

1,97,46,57,138

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  99,602 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.23% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.56% आहे.गेल्या 24 तासांत 11,574 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,28,08,666 झाली आहे.

गेल्या 24 तासात 14,506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,33,659 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.19 (86,19,23,059) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.35% आहे.

***

S.Thakur/S.Patgaonkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837814) Visitor Counter : 131