पंतप्रधान कार्यालय
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
Posted On:
27 JUN 2022 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2022
जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील विशेषत: 2019 मध्ये सहकार्याच्या धोरणात्मक कार्यक्रमावर स्वाक्षरी केल्यानंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी संरक्षण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि व्यापार आणि गुंतवणूक, अन्नसुरक्षा, संरक्षण, औषध निर्माण, डिजिटल आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास, विमा, आरोग्य आणि लोकांमधील संपर्क यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला.
जून 2022 मधील जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. हा करार विकसनशील देशांमध्ये कोविड-19 लसींच्या उत्पादनाला पाठिंबा दर्शवतो. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने कोविड -19 च्या प्रतिबंध, नियंत्रण किंवा उपचार संदर्भात TRIPS अर्थात बौद्धिक संपदा करार अधिकारांच्या व्यापार विषयक बाबींवरील कराराच्या काही तरतुदींच्या अंमलबजावणीवर जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी सवलत सुचवणारा पहिला प्रस्ताव सादर केला होता. बहुपक्षीय संस्थांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आणि सुधारणांची विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज यावरही यावेळी चर्चा झाली.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837399)
Visitor Counter : 167
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam