रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत एनसीएपी अर्थात नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर (सामान्य वैधानिक नियम) अधिसूचनेच्या मसुद्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2022 4:26PM by PIB Mumbai

 

भारत एनसीएपी (नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम) सुरू करण्यासाठी जीएसआर (general statutory rules) अधिसूचनेचा मसुदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार भारतातील वाहनांना त्यांच्या क्रॅश चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाईल.

भारत- एनसीएपी हा कार्यक्रम ग्राहक-केंद्रित व्यासपीठ म्हणून काम करेल. या योजनेमुळे ग्राहकांना स्टार-रेटिंगवर आधारित सुरक्षित कार निवडता येईल.  तसेच सुरक्षित वाहने तयार करण्यासाठी भारतातील OEM -original equipment manufacturer अर्थात उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्यांमधील निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देईल, असे ते ट्विट संदेश मालिकेत म्हणाले.

क्रॅश चाचण्यांवर आधारित भारतीय कारचे स्टार रेटिंग केवळ कारमधील संरचनात्मक आणि प्रवासी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर भारतीय वाहनांची निर्यात-योग्यता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारत एनसीएपीचा चाचणी प्रोटोकॉल सध्याच्या भारतीय नियमांमधील जागतिक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलशी  जोडला जाईल .  त्यामुळे उपकरणांच्या मूळ उत्पादकांना त्यांच्या वाहनांची चाचणी भारतातील स्वतःच्या इन-हाऊस चाचणी सुविधांमध्ये घेता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

भारताला जगातील आघाडीचे ऑटोमोबाईल हब बनविण्याच्या मिशनसह आमच्या वाहन उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत एनसीएपी महत्त्वपूर्ण साधन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1836759) आगंतुक पटल : 313
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam