मंत्रिमंडळ
भारतातर्फे श्रीलंकेत कोलंबो येथे बिमस्टेक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर स्थापन करण्यासाठीच्या सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2022 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंगालचा उपसागर इनीशी ए टी व अंतर्गत मल्टी सेकटोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन (बिमस्टेक) टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 30 मार्च 2022 रोजी कोलंबो येथे झालेल्या पाचव्या बिमस्टेक शिखर परिषदेत बिमस्टेक सदस्य देशांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
बिमस्टेक सदस्य देशांमध्ये तंत्रज्ञानांचे आदान प्रदान होण्यासाठी टी टी एफ इतर बाबींसह मुख्यत्वेजैव तंत्रज्ञान,नॅनो तंत्रज्ञान, माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान ऍप्लिकेशन्स, कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, औषध निर्मिती तंत्रज्ञान स्वयंचलन, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान स्वयंचलन, समुद्रविज्ञान, अणु तंत्रज्ञान ऍप्लिकेशन्स, ई कचरा आणि घनकचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी वापरता येणारे तंत्रज्ञान, अशा प्राधान्य क्षेत्रांमध्ये सुगमता आणेल
टी टी एफ मध्ये एक संचालक मंडळ असेल आणि टी टी एफच्या कामकाजावर या संचालक मंडळाचे नियंत्रण असेल. संचालक मंडळात प्रत्येक सदस्य देशाच्या एका प्रतिनिधीचा समावेश असेल.
बिमस्टेक टी टी एफ चे अपेक्षित परिणाम :
- बिमस्टेक देशांकडे उपलब्ध तंत्रज्ञानाची डेटाबँक
- तंत्रज्ञान देवाण घेवाण व्यवस्थापन, मानके, मान्यता, मेट्रोलॉजी , परीक्षण आणि कॅलिब्रेशन सुविधा या क्षेत्रांमध्ये सुयोग्य कार्य करण्याबाबत माहितीचा साठा
- क्षमता उभारणी, अनुभवांची देवाणघेवाण आणि विकासाबाबत सुयोग्य पद्धती
- बिमस्टेक देशांमध्ये तंत्रज्ञानांचे आदान प्रदान आणि वापर
* * *
R.Aghor/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833976)
आगंतुक पटल : 257
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam