पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले युवा विकासासाठी केलेल्या कार्याचे तपशील

Posted On: 12 JUN 2022 3:53PM by PIB Mumbai

 

गेल्या 8 वर्षांत युवा विकासासाठी सरकारने केलेल्या कामांचे तपशील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहेत. या प्रयत्नांचे वर्णन करणारे लेख आणि संबंधित ट्विट थ्रेड त्यांनी आपल्या संकेतस्थळावरून तसेच नमो अॅप आणि मायजीओव्ही (MyGov) वरून लोकांपर्यंत पोहोचवले आहेत.

पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणतात,

"युवाशक्ती हे आपले सर्वात मोठे बळ आहे. आपली तरुणाई विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करते आहे आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावते आहे. युवा विकासासाठी केलेल्या काही प्रमुख प्रयत्नांचे संकलित स्वरूपात वर्णन या लेखांमध्ये करण्यात आले आहे. #8SaalYuvaShaktiKeNaam"

"आमच्या सरकारचा 8 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे, युवक-युवतींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त क्षमतांचा परिपूर्ण उपयोग करण्यासाठी सक्षम करण्याचा काळ होता. हा ट्विटर थ्रेड पाहा... #8SaalYuvaShaktiKeNaam"

"देशाची युवाशक्ती म्हणजे नवभारताचा आधारस्तंभ आहे आणि गेल्या आठ वर्षांत आम्ही या शक्तीला अधिकाधिक बळकट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. नवे शिक्षणधोरण असो की आयआयटी आणि आयआयएमचा विस्तार असो, नवीन स्टार्टअप उद्योग आणि युनिकॉर्न उद्योगांपासून ते खेलो इंडिया केंद्रापर्यन्त - या सगळ्या कामांबरोबरच, तरुणांसाठी आवश्यक असणारे प्रत्येक काम, गरजेचा प्रत्येक उपक्रम केला आहे."

***

VS/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833310) Visitor Counter : 141