गृह मंत्रालय
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
Posted On:
09 JUN 2022 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2022
भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/एजन्सी यांच्यामार्फत त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि इतर सामाजिक कार्यामध्ये असामान्य योगदान देणा-या लोकांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला ओळख निर्माण करून देण्यासाठी अनेक नागरी पुरस्कार प्रदान केले जातात.
विविध पुरस्कारांसाठी नामांकने आमंत्रित करण्यासाठी, तसेच भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांचे सर्व पुरस्कार डिजिटल मंचावर एकत्र आणण्यासाठी सरकारने एक समान राष्ट्रीय पुरस्कर पोर्टल (https://awards.gov.in) विकसित केले आहे. पारदर्शकता आणि जन भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल मंचाअंतर्गत या पुरस्कारांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत; या पोर्टलचे उद्दिष्ट भारत सरकारच्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांना नामनिर्देशित करण्यासाठी नागरिकांना सुविधा देणे हा आहे.
सध्या, खालील पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी खुल्या आहेत:
- पद्म पुरस्कार- नामांकन 15/09/2022 पर्यंत खुले आहे.
- सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार- नामांकन 31/07/2022 पर्यंत खुले आहे.
- तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहे
- जीवन रक्षा पदक पुरस्कार- नामांकन 30/09/ 2022 पर्यंत खुले आहे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय दूरसंचार कौशल्य उत्कृष्टता पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहे. (https://awards.gov.in )
अधिक तपशीलांसाठी आणि नामांकनासाठी, कृपया राष्ट्रीय पुरस्कर पोर्टलला भेट द्यावी.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832626)
Visitor Counter : 244