नौवहन मंत्रालय

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयात संधी देण्यासाठी सागरमाला युवा व्यावसायिक योजना

Posted On: 03 JUN 2022 11:25AM by PIB Mumbai

केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये युवा, प्रतिभाशाली, दूरदर्शी विचारसरणी असलेल्या तसेच चैतन्यशील व्यावसायिकांना संधी देण्याची योजना तयार केली आहे.

 

या योजनेत तरूण व्यावसायिकांना वास्तवातील प्रत्यक्ष शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारची कार्यशैली आणि विकासात्मक धोरणविषयक मुद्यांबाबत शिकण्याची संधी व्यावसायिकांना मिळेल. मंत्रालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इतर मुद्यांसह पायाभूत सुविधा, विदा(ड़ेटा) विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन, स्टार्टअप्स, नाविन्यपूर्ण संशोधन, कौशल्य विकास, डिजिटल परिवर्तन आणि पर्यावरण या क्षेत्रांत व्यावसायिकांनी उच्च गुणवत्ता असलेल्या सूचनांनुसार काम करण्याची आवश्यकता आहे.

 

ही योजना निर्णय प्रक्रियेत तरूण व्यावसायिकांच्या सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देणार आहे. यामुळे वैयक्तिक स्तरावर, स्वयंप्रतिष्ठा आणि सक्षमीकरणाची जाणीव यांना चालना देऊन सामाजिक कल्याणात पुढील योगदान दिले जाईल. त्याचबरोबर, सामायिक मुद्यांवर अधिक जनजागृती आणि दीर्घकालीन उपयुक्त ठरतील असे तोडगे निश्चित करण्यासाठी संयुक्त निर्धार करण्यासारखे महत्वाचे लाभही मिळणार आहेत.

 

सुरूवातीला, या योजनेंतर्गत 25 हून अधिक व्यावसायिकांची भरती केली जाईल. व्यावसायिकांकडे बी.ई किंवा बी. टेक किंवा बी. प्लॅनिंग आणि एमबीए किंवा संबंधित विषयात किंवा क्षेत्रात समकक्ष पदवी तसेच संबधित क्षेत्राचा किमान तीन वर्षांचा कार्य अनुभव आवश्यक असेल. लेखा, अर्थ, कायदा, सांख्यिकी, अर्थशास्त्र/ वाणिज्य, विदा विश्लेषण यांत कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनाही मंत्रालयाच्या आवश्यकतेनुसार संधी दिली जाईल. सुरूवातीचा कार्यकाल 2 वर्षांचा असेल आणि कामगिरीच्या आधारावर तो आणखी 2 वर्षे वाढवता येऊ शकेल.

मंत्रालयाचे संकेतस्थळ आणि कामगार तसेच रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर अर्ज मागवण्यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी युवकांना सरकारी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले तर प्रशासकीय कार्यात त्यांची रुची वाढेल. तसेच युवकांमध्ये सागरी क्षेत्राबद्दल जागृती निर्माण होईल, अशीही अपेक्षा सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे.

***

S.Thakur/U.Kulkarni/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830751) Visitor Counter : 199