पंतप्रधान कार्यालय

नागरी सेवा मुख्य परीक्षा, 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 30 MAY 2022 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा  परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशांमध्ये म्हटले आहे;

नागरी सेवा परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना भारताच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाच्या प्रसंगी  आपली प्रशासकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या या तरुणांना माझ्या शुभेच्छा.

नागरी सेवा परीक्षा जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांचा अपेक्षाभंग मी पूर्णपणे जाणतो परंतु मला हे देखील माहीत आहे की हे असामान्य तरुण ज्या क्षेत्रात काम करतील तिथे आपला ठसा उमटवतील आणि देशाचा गौरव उंचावतील. त्यांना माझ्या शुभेच्छा.  

 

  G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829504) Visitor Counter : 130