आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) आयुष्मान भारत डिजिटल अभियानासाठी (एबीडीएम) सुरु केला सार्वजनिक ऑनलाईन डॅशबोर्ड


एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्ड हे एकाच ठिकाणी अभियानाच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील प्रगतीची माहिती मिळणारे ठिकाण

Posted On: 30 MAY 2022 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022
 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) आपल्या आयुष्मान भारत डिजिटल अभियान (एबीडीएम) या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत या अभियानाची अद्ययावत माहिती देण्यासाठी सार्वजनिक डॅशबोर्ड सुरु केला आहे. एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्ड या अभियाना अंतर्गत  झालेल्या पुढील प्रमुख नोंदणीची तपशीलवार माहिती प्रदर्शित करतो- आयुष्मान भारत आरोग्य खाते (एबीएचए) क्रमांक, आरोग्य सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांची नोंदणी (एचपीआर)  आणि आरोग्य सुविधा नोंदणी (एचएफआर).

या डॅशबोर्डवरील माहिती नुसार 30 मे 2022 पर्यंत एकूण 22. 1 कोटी आयुष्मान भारत आरोग्य खाती (पूर्वीचे आरोग्य आयडी) उघडण्यात आली, 16.6  हजार  पेक्षा जास्त आरोग्य सेवा व्यावसायिकांनी (एचपीआर)  नोंदणी केली, 69.4 हजार पेक्षा जास्त आरोग्य सुविधांची  एचएफआर अंतर्गत नोंदणी झाली, 1 लाख 80 हजारां पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे आरोग्याबाबतचे तपशील नोंदवले गेले आणि नुकत्याच सुधारणा करण्यात आलेल्या एबीएचए अॅप डाउनलोड करणाऱ्यांच्या संख्येने 5. 10 लाखाचा टप्पा ओलांडला.

एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्ड वापरकर्त्यांना एबीडीएम वेबसाईटवरून अथवा पुढील लिंकवरून सहज उपलब्ध होईल: https://dashboard.abdm.gov.in/abdm/ . डॅशबोर्ड एबीएचए क्रमांकाशी संबंधित माहिती मिळवतो, डॉक्टर्स, नर्सेस यासारख्या आरोग्य सुविधा व्यावसायिकांचे नोंदणीकृत  क्रमांक, एबीएचए क्रमांकाला जोडलेल्या डिजिटल आरोग्य नोंदी. डॅशबोर्डवर आरोग्य सुविधांच्या क्रमांकाशी संबंधित तपशील देखील आहेत, जसे रुग्णालये, प्रयोगशाळा वगैरे, ज्यांची नोंद रोज अथवा त्या तारखेपर्यंत झाली आहे. त्याच प्रमाणे एबीएचए वर नोंदवलेला भागीदाराचे तपशील आणि डिजिटल आरोग्य तपशील जे त्या तारखेपर्यंत  डॅशबोर्डवर उपलब्ध करण्यात आले आहेत. ही माहिती पुढे अनेक प्रमुख घटकांमध्ये विभागली आहे, ज्याच्या मदतीने विशिष्ट क्षेत्रातील   योजनेच्या प्रगतीची ताजी माहिती मिळते.  

सार्वजनिक डॅशबोर्ड या संकल्पनेबद्दल अधिक माहिती देताना एनएचए चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले. “ एबीडीएम हे सहज उपलब्धता, पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि आंतर उपयोगिता या तत्त्वांवर आधारित आहे. हा  सार्वजनिक डॅशबोर्ड योजनेशी संबंधित ताजी माहिती सर्वांना देतो, ज्यायोगे सर्व भागधारकांना पारदर्शक पद्धतीने  माहिती उपलब्ध होईल. या डॅशबोर्ड सर्व भागधारकांनी आणि आरोग्य नोंदी ठेवणाऱ्या मंचानी बनवलेल्या एबीएचए  क्रमांकांबाबतची सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे एबीडीएम ने केलेल्या प्रगतीचे चित्र स्पष्ट  होते.”

एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्ड राष्ट्रीय तसेच राज्य/केंद्रशासित प्रदेश पातळीवर तयार करण्यात आलेल्या एबीएचए क्रमांकांची पारदर्शक माहिती देते. हे क्रमांक पुढे लिंग आणि वयाच्या आधारावर वेगळे करण्यात आले आहेत. एबीएचए क्रमांक तयार करण्याची सुविधा कोविन, पीएम जेएवाय, आरोग्य सेतू, आंध्रप्रदेश सरकार, ई-सुश्रुत रेल्वे रुग्णालय अशा लोकप्रिय डिजिटल आरोग्य अॅप्लिकेशनवर देखील उपलब्ध आहे. एबीडीएम डॅशबोर्ड भागीदाराची कामगिरी आणि प्रत्येक भागीदाराने जोडलेल्या आरोग्य नोंदींची माहिती देखील  प्रदर्शित करते.  

आरोग्य सुविधा नोंदणीसाठी डॅशबोर्ड इंफोग्रफिक स्वरूपातील माहिती (सरकारी-खासगी भागीदारीवर आधारित) प्रदर्शित करतो, औषध प्रणाली (आधुनिक औषध, अॅलोपथी, आयुर्वेद, सोवा-रिगपा, फ़िझिओ थेरपी, युनानी, डेनटीस्ट्री, सिद्ध, होमिओपथी वगैरे) आणि एबीडीएम अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या राज्य पातळीवरील सुविधा. तसेच, डॅशबोर्ड  एचपीआर साठी  त्यांच्या रोजगाराच्या प्रकारानुसार वेगळी करण्यात आलेली माहिती प्रसारित करतो-  सरकारी अथवा खासगी क्षेत्र, औषध प्रणाली, आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश जिथून अर्ज आले आहेत.  

एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या तपशीलवार माहिती व्यतिरिक्त एबीडीएम च्या प्रमुख वेबसाईटवर  (https://abdm.gov.in/) क्रमांकासह विविध विभाग संक्षिप्त क्रमांकासह   प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच एबीडीएम सॅन्डबाॅक्स पोर्टलवर डॅशबोर्ड विभाग आहे (https://sandbox.abdm.gov.in/applications/Integrators), ज्या ठिकाणी सर्व समावेशक/ आरोग्य तंत्रज्ञान सुविधा पुरवठादार/ एबीडीएमशी सल्लग्न अॅप्स आणि एबीडीएम भागधारकांचे तपशील प्रदर्शित करण्यात आले आहेत.  


S.Tupe/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1829496) Visitor Counter : 198