माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीच्या बातम्यांचा श्रोतृवृंद लाखोंच्या घरात

Posted On: 25 MAY 2022 4:28PM by PIB Mumbai

 

वृत्त माध्यम उद्योगातील विश्वास आणि सत्यतेचा प्रश्न येतो तेव्हा, आकाशवाणीच्या बातम्या सर्वांमध्ये सरस ठरतात. रॉयटर्स इन्स्टिट्यूटच्या 2021 च्या अहवालाने याची पुष्टी केली आहे आणि ऑल इंडिया रेडिओ न्यूज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे साध्य केलेल्या नवीन टप्प्यामुळे याला आणखी पुष्टी मिळाली आहे; अलीकडचेच सांगायचे तर ट्विटरवर 3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001R1NM.jpg

2013 मध्ये प्रारंभ  झाल्यापासून, या ट्विटर हँडलने दररोज सुमारे दशलक्ष 'इंप्रेशन'सह सातत्यपूर्ण वाढ पाहिली आहे. या हँडलशिवाय, @AIRNewsHindi आणि @AIRNewsUrdu वर नियमित अपडेट्स देखील उपलब्ध असतात. आकाशवाणी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या 44 ट्विटर हँडलद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये बातम्या प्रसारित करत आहे.

बदलत्या काळाच्या अनुषंगाने, आकाशवाणीच्या बातम्यांनी जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला ठसा मोठ्या प्रमाणात उमटवला आहे. ऑल इंडिया रेडिओ पारंपरिक माध्यमांसह युट्यूब, अॅप, वेबसाइट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि कू सारख्या इतर विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर ताज्या बातम्या उपलब्ध करत आहे, ज्यामुळे विश्वसनीय बातम्यांचे ते सर्वव्यापी माध्यम बनले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0026X81.jpg

NewsOnAir अॅप हे ऑल इंडिया रेडिओसाठी परिवर्तनकारी सिद्ध झाले आहे कारण NewsOnAir अॅपवर 270 आकाशवाणी वाहिन्या भारतात आणि जागतिक स्तरावर 190 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहेत. NewsOnAir अॅपवरील काही आकाशवाणी वाहिन्या जसे की विविध भारती, एअर पंजाबी आणि एअर न्यूज 24*7 यापैकी अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

आकाशवाणी बातम्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलची 3 वर्षांच्या अल्प कालावधीत 4.5 लाख सदस्यांपर्यंत झालेली वाढ सर्व प्लॅटफॉर्मवरील ऑल इंडिया रेडिओच्या बातम्यांची प्रासंगिकता दर्शवते. 2019 मध्ये स्ट्रीमिंग सुरू झाल्यापासून, श्रोत्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ झाली आहे, जी 22 लाख तासांपेक्षा जास्त झाली आहे आणि  'इंप्रेशन्सचीएकूण 38 कोटींहून अधिक वाढ  झाला आहे. या सर्व प्लॅटफॉर्मवरील वाढ पूर्णपणे संघटनात्मक आहे.

आणखी एक मैलाचा टप्पा म्हणजे, आकाशवाणीच्या बातम्यांसाठी फेसबुकवरील फॉलोअर्सची संख्या 3.4 दशलक्षहून अधिक झाली आहे. आकाशवाणी बातम्यांच्या फेसबुक पेजवरील फॉलोअर्स 43 हून अधिक वेगवेगळ्या देशांतील आहेत. यामुळे तो भारताचा आवाज बनतो आणि भारत आणि परदेशातील भारतीय समूह यांच्यातील दुवादेखील बनतो. भारतीय दृष्टिकोनावर  लक्ष केंद्रित करून वर्ल्ड न्यूज कार्यक्रमासारखे रेडिओ कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेमपती   यांनी या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी आकाशवाणी भवन येथे सोशल मीडिया टीमची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या सर्जनशील भावनेने नवीन उंची गाठण्याचे आवाहन केले. ऑल इंडिया रेडिओ न्यूजचे प्रधान महासंचालक, एनव्ही रेड्डी म्हणाले की, हा सांघिक भावनेचा परिणाम आहे आणि आकाशवाणी बातम्या लोकांमध्ये असलेल्या विश्वासार्हतेचे प्रतिबिंब आहे.

स्वातंत्र्य चळवळीवरील प्रश्नमंजुषा, क्रीडा प्रश्नमंजुषा आणि अभ्यास यांसारख्या विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कार्यक्रमांमुळे नवीन पिढीला त्यांच्या माध्यम निवडीत आकाशवाणीला एक नियमित वैशिष्ठय  मानण्याची आवड निर्माण झाली आहे.

परदेशातील भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भारताची जागतिक व्याप्ती आणि सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी, आकाशवाणी बातम्यांनी दारी, पश्तो, बलुची, नेपाळी, मंदारिन चायनीज आणि तिबेटीसह परदेशी भाषांमधील प्रसारण दुप्पट केले आहे.

पारंपरिक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, ऑल इंडिया रेडिओ DD FreeDish DTH आणि DRM वर देखील उपलब्ध आहे.

1936 मध्ये स्थापन झालेले ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे. हे 77 भारतीय आणि 12 परदेशी भाषांमध्ये बातम्या आणि चालू घडामोडींचे कार्यक्रम प्रसारित करते.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828232) Visitor Counter : 221