पंतप्रधान कार्यालय
महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
कांस्य पदक विजेत्या मनिषा मौन आणि परवीन हुडा यांचेही केले अभिनंदन
Posted On:
19 MAY 2022 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. कांस्य पदक विजेत्या मनिषा मौन आणि परवीन हुडा यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
“आपल्या मुष्टियोद्ध्यांनी आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावली आहे! महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल निखत झरीन हिचे अभिनंदन. याच स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या मनिषा मौन आणि परवीन हुडा यांचेही मी अभिनंदन करतो,” असा अभिनंदनपर ट्वीट संदेश पंतप्रधानांनी पाठवला आहे.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827191)
Visitor Counter : 121
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam