माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कान चित्रपट महोत्सवात भारत - प्रत्यक्ष स्थळावरून डी डी इंडियाचं वृत्तांकन

Posted On: 19 MAY 2022 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2022

 

फेस्टिव्हल डी कान चा अनुभव प्रत्यक्ष स्वरूपात घेणे, या चित्रपट महोत्सवाला जवळून अनुभवणे ही प्रत्येक चित्रपटप्रेमी रसिकाची परमोच्च इच्छा असते, भारतीय चित्रपटप्रेमी रसिक प्रेक्षकांना हा अनुभव म्हणजे एका उत्कृष्ट चित्रपट प्रवासाचा वास्तवापेक्षा भव्य असा वैशिष्ट्यपूर्ण भावबंध आहे. दूरदर्शनची आंतरराष्ट्रीय वाहिनी डी डी इंडिया तुम्हाला एका आगळ्या प्रवासाला नेत आहे जिथे तुम्हाला जागतिकस्तरावरच्या  चित्रपट जगताची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्य जाणून घेता येतील. डी डी इंडिया ही एकमेव वृत्तवाहिनी भारतातून या महोत्सवाचे प्रत्यक्ष वार्तांकन करत आहे. 

चित्रपट क्षेत्रातल्या असंख्य तारे-तारकांच्या उपस्थितीत झालेल्या भारतीय दालनाच्या उदघाटना दरम्यान डी डी इंडियाने संपूर्ण कार्यक्रमाचे वार्तांकन केले. याशिवाय डीडी इंडिया आणि डीडी न्यूज या वाहिन्यांवर इंडिया ऍट कान’ हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दररोज  सुरू आहे. या कार्यक्रमात महोत्सवातली ऊर्जा आणि विविध भावभावनांचे दर्शन होते, चित्रपटसृष्टीतले उदयोन्मुख ट्रेंड, 21 व्या शतकातील चित्रपट महोत्सवांची प्रासंगिकता आणि दृश्य प्रतिमांची भावविभोर मांडणी यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांना कानचा विलक्षण समृद्ध असा अनुभव देऊन जातो. त्यासह भारताची प्रतिमा "आशय केंद्र" म्हणून उदयाला येत असल्याचं या कार्यक्रमातून प्रतीत होते. डी डी इंडिया, तिथे उपस्थित असलेल्या दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेत असल्याने त्यांचे जीवन कार्य आणि कारकीर्द याविषयी अधिक माहिती जाणून घेता येते.

कान महोत्सवाच्या या आवृत्तीत भारताला सन्माननीय देशाचा बहुमान लाभला असल्याने,  डीडी इंडिया, प्रेक्षकांना कान चित्रपट क्षेत्रातल्या उदयोन्मुख  दिग्गज कलाकारांशी जोडत आहे. जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश म्हणून ओळख असलेल्या भारतातल्या चित्रपटांसाठी आशयघन कथा शोधण्याचा शेखर कपूर यांचा प्रयत्न, जगाचे  आशय केंद्र बनण्याच्या भारताच्या अफाट क्षमतेबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे विचार  आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी  महोत्सवाच्या चैतन्यदायी ऊर्जेबद्दल व्यक्त केलेली भावना, हे सर्व पैलू प्रत्यक्ष महोत्सवाच्या स्थळापासून आकर्षक चॅट्ससह स्क्रीनवर दाखवले जात आहेत.

'इंडिया ऍट कान’ हा दैनंदिन कार्यक्रम डी डी इंडिया वर रोज रात्री दहा वाजता आणि डी डी न्यूज वर साडे दहा वाजता बघता येईल. कान चित्रपट महोत्सव 2022 पाहण्यासाठी खाली दिलेला QR code स्कॅन करा.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001FNOY.jpg

* * *

S.Tupe/B.Sonatakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826670) Visitor Counter : 190