पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
Posted On:
15 MAY 2022 3:06PM by PIB Mumbai
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून 16 मे 2022 रोजी मी लुंबिनी, नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहे.
मी बुद्ध जयंतीच्या शुभ प्रसंगी मायादेवी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी उत्सुक आहे. कोट्यवधी भारतीयांच्या पावलावर पाऊल ठेवून भगवान बुद्धांच्या पवित्र जन्म स्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्याचा मला सन्मान वाटतो.
गेल्या महिन्यात पंतप्रधान देउबा यांच्या भारत दौऱ्या दरम्यान आमच्यात झालेल्या फलदायी चर्चेनंतर मी त्यांना पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे.जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याचा विस्तार करण्यासाठी आम्ही आमची सामायिक मतैक्य विकसित करत राहू.
पवित्र मायादेवी मंदिराला भेट देण्याव्यतिरिक्त, मी लुंबिनी विहार क्षेत्रातील 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या "शिलान्यास" समारंभात सहभागी होणार आहे.नेपाळ सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभांनाही मी उपस्थित राहणार आहे.
नेपाळशी आमचे संबंध अतुलनीय आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संपर्क ही आमच्या घनिष्ट संबंधांची चिरस्थायी बांधणी आहे. शतकानुशतके जोपासले गेलेले आणि आपल्या परस्पर-मिसळणीचे प्रदीर्घ इतिहासात नोंदवलेले हे काल-सन्मानित संबंध साजरे करणे आणि ते अधिक दृढ करणे हा माझ्या दौऱ्याचा उद्देश आहे.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825517)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam