पंतप्रधान कार्यालय
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष, महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
13 MAY 2022 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2022
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष ,महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते एक महान राजकारणी आणि दूरदर्शी नेते होते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारत-यूएई संबंध समृद्ध झाले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाबाबत समजल्या नंतर अत्यंत दुःख झाले.ते एक महान राजकारणी आणि दूरदर्शी नेते होते त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-संयुक्त अरब अमिराती संबंध समृद्ध झाले. संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांप्रति भारतीय जनतेच्या मनापासून संवेदना आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1825193)
आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam