रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
प्रतिदिन 50 किमी या विक्रमी वेगाने वर्ष 2022-23 मध्ये18000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास वचनबद्ध : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Posted On:
12 MAY 2022 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आमच्या समोर असून, 2022-23 मध्ये प्रतिदिन 50 किमी अशा विक्रमी वेगाने 18,000 किमी राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याचा देशभर विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

ट्वीट संदेशात ते म्हणाले, 2025 पर्यंत 2 लाख किमी पर्यंत राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नितीन गडकरी यांनी जागतिक दर्जाच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा ठरविलेल्या वेळेतच आणि उद्दिष्ट समोर ठेवून बांधण्यात याव्यात यावर भर दिला; कारण रस्ता ही पायाभूत सुविधा असून तो आत्मनिर्भर भारताचा 'आत्मा' आहे.
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824752)