पंतप्रधान कार्यालय

दक्षिण कोरिया प्रजासत्ताकच्या (आरओके) अध्यक्षांना पदभार स्विकारल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 10 MAY 2022 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक  चे (आरओके) अध्यक्ष महामहिम यून सूक-येओल यांना आज पदभार स्विकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"मी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक चे (आरओके) अध्यक्ष @sukyeol__yoon यांना आज कार्यकाळ सुरू करत असताना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मी त्यांना लवकरच भेटण्यास  तसेच भारत- दक्षिण कोरिया प्रजासत्ताक  संबंध अधिक दृढ आणि समृद्ध करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे."

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824130) Visitor Counter : 160