पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

अबीदजान इथल्या, कोटे डी'आयव्होअर येथे जगभरातील वाळवंटीकरणाच्या समस्येवर मात करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएनसीसीडी) कॉन्फरन्स ऑफ द पार्टीजच्या (कॉप15) 15 व्या सत्रात भारतीय शिष्टमंडळाचे भूपेंद्र यादव करणार नेतृत्व.


परिषदेतील प्रमुखांसह उच्चस्तरीय सभेला मंत्री महोदय करणार संबोधित

Posted On: 10 MAY 2022 10:16AM by PIB Mumbai

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, 9 ते 20 मे 2022 दरम्यान जगभरातील वाळवंटीकरणाच्या समस्येवर मात करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएनसीसीडी कॉप 15) परिषदेच्या 15 व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अबिदजान, कोटे डी आयव्होअर येथे पोहोचले आहेत .

भारताने 2 ते 13 सप्टेंबर 2019 या कालावधीत जगभरातील वाळवंटीकरणाच्या समस्येवर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कॉप परिषदेचे चौदावे सत्र नवी दिल्ली येथे आयोजित केले होते आणि भारत यंदा ही या परिषदेचा  अध्यक्ष आहे.

“ सर्वात निकृष्ट आणि परीसंस्थेच्या दृष्टीने  अतिशय  असुरक्षित  अशा  देशातील 26 दशलक्ष हेक्टर जमिनीची उत्पादकता आणि परिसंस्था सेवा पुनर्जीवीत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, यात निकृष्ट शेती, जंगले आणि इतर पडीक जमिनींवर पुनर्वसंवर्धन दृष्टीकोनातून भर देण्यात येईल." असे पंतप्रधानांनी 14 व्या कॉप परिषदेत सांगितले होते.

कोविड-महामारीचे संकट असतानाही, भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या काळात,अशा भूमीचा ऱ्हास थांबवण्याच्या आणि ती पूर्ववत करण्याच्या जागतिक उद्दिष्टासाठी राष्ट्रांना एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये, जी-20 नेत्यांनी जमिनीचा पोत खराब होण्याच्या समस्येवर मात करण्याचे आणि नवीन कार्बन सिंक तयार करण्याचे महत्त्व ओळखून, 2030 पर्यंत एकत्रितपणे 1 ट्रिलियन झाडे लावण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आणि या जागतिक उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी इतर देशांना जी 20 सोबत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे 

अबिदजान, कोटे डी'आयव्होर येथे 9 ते 20 मे 2022 या कालावधीत जगभरातील वाळवंटीकरणाच्या समस्येवर मात करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएनसीसीडी कॉप 15) परिषदेच्या 15 व्या सत्रात सरकार, खाजगी क्षेत्र, नागरी क्षेत्रातील  कार्यकर्ते आणि इतर प्रमुख भागधारक एकत्र येतील. 

दुष्काळ, जमीन पुनर्संवर्धित करणे सोबतच जमिनीचे हक्क, लिंगभाव समानता आणि युवकांचे सक्षमीकरण हे मुद्दे परिषदेच्या केन्द्रस्थानी आहेत.

***

 JPS/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824090) Visitor Counter : 285