पंतप्रधान कार्यालय

जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन


कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 06 MAY 2022 1:58PM by PIB Mumbai
मित्रहो,
 
आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की आपल्यासारखे विशेषतः माझे युवा जैन समाजातील नव उद्योजक आहेत, संशोधक आहेत, तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात जैन इटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनकडून एक संस्था म्हणून आणि आपल्या सारख्या सर्व सदस्यांकडूनही देशाच्या सहाजिकच जास्त अपेक्षा आहेत. शिक्षण असो, आरोग्य असो किंवा छोट्या-मोठ्या कल्याणकारी संस्था असोत, जैन समाजाने सर्वोत्कृष्ट संस्था, सर्वोत्कृष्ट पद्दधत आणि सर्वोत्कृष्ट सेवा या गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आणि आजही समाजाची आपल्याकडून अपेक्षा असणे सहाजिक आहे. माझी तर आपल्याकडून विशेष अपेक्षा आहे की आपण स्थानिक उत्पादनांवर भर द्या. वोकल फोर लोकल या मंत्रावर मार्गक्रमणा करताना आपण सर्वजण निर्यातीसाठी नवीन जागा शोधा. आपल्या विभागातील स्थानिक उद्योजकांना त्यासंदर्भात जागृत करा. उत्पादनांचा दर्जा आणि कमीत कमी पर्यावरणाची हानी यामुळे आपल्याला झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट या आधारावर काम करायचे आहे. म्हणून आज JITO जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांना एक छोटासा गृहपाठ देऊ इच्छतो. आपण ते कराल यावर माझा विश्वास आहे. पण सांगणार नाही परंतु नक्की करा. आपण कराल ना? जरा हात वर करून मला सांगा, कराल ना? तर एक काम करा कुटुंबातील सर्व लोक एक बसा. यादी तयार करा. त्यात सकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आपल्या जीवनात किती परदेशी वस्तूंचा प्रवेश झाला आहे ते लिहा. आपल्या स्वयंपाक घरात आपल्या रोजच्या व्यवहारात परदेशी वस्तू आल्या आहेत. प्रत्येक वस्तू किती परदेशी आहे ते बघा आणि समोर टिकमार्क करा की त्या पैकी कोणत्या वस्तू भारतीय असल्या तरी चालेल आणि सर्व कुटुंब मिळून हे निश्चित करा की, चला ही पंधराशे वस्तूंची यादी तयार झाली आहे. आता यामधल्या पाचशे परदेशी गोष्टी तरी या महिन्यात बंद करू, त्यानंतर अजून दोनशे, त्याच्यापुढे शंभर. वीस पंचवीस पन्नास गोष्टींबद्दल कदाचित वाटेल की त्या बाहेरूनच आणाव्या लागतील, तर चालेल. तेवढं मान्य करून घेऊ. परंतु, मित्रहो कधीतरी आपण विचार केला आहे का की आपण कशा प्रकारच्या मानसिक गुलामीत वावरत आहोत. त्याच प्रमाणे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत मात्र परदेशी वस्तूंचे गुलाम झालो आहोत याचा आपल्याला पत्ताही नाही. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश असाच झाला होता. कळलेही नाही आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगतो आहे. त्याचप्रमाणे मी JITO च्या सर्व सदस्यांना ही आग्रह करतो की आपल्याला दुसरं काहीच करायचं नसेल तर नका करू, जर माझं सांगणं योग्य वाटत नसेल तर करू नका. परंतु एकदा तरी कागदावर अशी यादी नक्की बनवा. कुटुंबातील सर्व लोकांनी अशा तऱ्हेची एकत्र बैठक जरूर घ्यावी. आपल्याला माहितीही नसेल की जी आपल्या घरी रोज वापरली जात आहे ती परदेशातून आलेली वस्तू आहे . आपल्याला माहितही नसेल आणि आपला त्या वस्तू परदेशातून आणण्याचा आग्रह सुद्धा नसेल पण आपल्याकडून ते झाले. म्हणूनच पुन्हा पुन्हा ‘वोकल फॉर लोकल’. आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळायला हवा. आपल्या देशातील लोकांना संधी मिळायला हवी. जर आपल्याला आपल्या वस्तुंचा अभिमान असला तर कुठे जग आपल्या वस्तूंचा अभिमान बाळगेल, यावर आपली पैज . मित्रांनो.
 
मित्रहो
 
मला सर्वांना अजून एक आग्रहाचे सांगणे आहे ते आपल्या वसुंधरेसाठी. जैन व्यक्ती जेव्हा ‘अर्थ’ शब्द ऐकते तेव्हा तिला पैसा आठवतो. परंतु मी दुसऱ्या ‘अर्थ’बद्दल बोलत आहे. आणि ह्या अर्थ साठी जेव्हा मी सांगतो तेव्हा म्हणजेच पर्यावरण संवर्धन ज्यात अंतर्भूत असेल अशा गुंतवणुकीला, अशा पद्धतीला आपण प्रोत्साहन द्या. पुढील वर्षाच्या 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवरे बनवण्याच्या प्रयत्न करू शकाल यावरही आपल्यात जरूर चर्चा होऊ दे. तर जसं मी म्हणालो इन्व्हायरमेंट म्हणजे ऍग्रीकल्चर या गोष्टींना अधिक उपयुक्त बनवण्यासाठी नैसर्गिक शेती, शेती, झिरो कॉस्ट बजेटिंग वाली शेती, शेती तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रातही JITO च्या माझ्या तरुण मित्रांनी पुढे यावे आणि स्टार्टअप सुरू करावे, गुंतवणूक करावी, मग आर म्हणजे रिसायकलिंग, सर्क्युलर इकॉनॉमीवर जोर द्यावा आणि रियुज, रिडयुस आणि रिसायकलिंग यासाठी काम करावे म्हणजे टेक्नॉलॉजीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावे आपण ड्रोन तंत्रज्ञानासारख्या दुसऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला सोपे कसे बनवू शकता यावर नक्की विचार करू शकाल. एच म्हणजे हेल्थकेअर देशात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय अशा व्यवस्थासाठी आजमितीला सरकार फार मोठे काम करत आहे. आपली संस्था यासाठी कशापद्धतीने प्रोत्साहन देऊ शकेल यावर नक्की विचार करा. आयुष उपचारपद्धती या क्षेत्रात संशोधन आणि विकासाला पुढे नेण्यासंदर्भात सुद्धा आपल्याकडून देशाला अधिकात अधिक अपेक्षा आहे.
 
माझा विश्वास आहे की या परिषदेतून स्वातंत्र्याच्या अमृत काळासाठी खूप उत्तम सुचना येतील. उत्तम तोडगे मिळतील आणि आपण नेहमी लक्षात ठेवा आपल्या तर नावातच ‘जितो’ आहे. आपण आपल्या संकल्पना सिद्ध करा. विजय म्हणजे फक्त विजय याच भावनेबरोबर मार्गक्रमण करा. याच भावनेतून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
 
जय जिनेन्द्र! धन्यवाद!
***
SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823418) Visitor Counter : 163