अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 14 राज्यांना 7,183कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत


महसूली तूट भरून काढण्यासाठीच्या अनुदानापोटी विद्यमान आर्थिक वर्षात राज्यांना एकूण 7,183 कोटी 84 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले

वर्ष 2022-23 मध्ये महसुलातील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना एकूण 86,201 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे

Posted On: 06 MAY 2022 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2022

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने शुक्रवारी 14 राज्यांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदानाचा 7,183 कोटी 42 लाख रुपयांचा 2रा मासिक हप्ता आज नवी दिल्ली येथे वितरीत केला. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार हे अनुदान देण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने वर्ष 2022-23 मध्ये पोस्ट-डिव्होल्यूशन महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 14 राज्यांना एकूण 86,201 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस केली आहे. शिफारस केलेल्या राज्यांना वित्त आयोगाच्या सूचनेनुसार देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम 12 समान मासिक हप्त्यांमध्ये विभागून दिली जाणार आहे. या वितरणानंतर, 2022-23 या  आर्थिक वर्षात पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान म्हणून राज्यांना दिली गेलेली एकूण रक्कम 14,366 कोटी 84 लाख रुपये झाली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या 275 व्या कलमातील तरतुदीनुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान देण्यात येते. 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार डिव्होल्यूशन नंतर येणारी महसुली खात्यातील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना अनुदानाचा हप्ता वितरीत केला जातो.

राज्यांना मिळणारा महसूल आणि त्यांचा खर्च यांच्यातील तफावतीच्या आधारावर वित्त आयोगाने मूल्यमापित डिव्होल्यूशन विचारात घेतल्यानंतर आर्थिक वर्ष 2020-21 ते 2025-26 या कालावधीदरम्यान त्या राज्यांची हे अनुदान मिळविण्याची पात्रता आणि अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान पोस्ट-डिव्होल्यूशन महसुलातील तूट भरून काढण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने अनुदान जाहीर केले आहे त्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत: आंध्रप्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल. वर्ष 2022-23 साठी शिफारस करण्यात आलेले पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान आणि त्याचा दुसरा हप्ता म्हणून राज्यांना वितरीत झालेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे:

राज्य-निहाय वितरीत झालेले पोस्ट-डिव्होल्यूशन महसुली तूट अनुदान (तक्ता)

(रक्कम कोटी रुपयांमध्ये)

S.No.

Name of State

PDRDG recommended by FC-XV for the year 2022-23.

2nd installment released for the month of May, 2022.

1

Andhra Pradesh

10,549

879.08

2

Assam

4,890

407.50

3

Himachal Pradesh

9,377

781.42

4

Kerala

13,174

1097.83

5

Manipur

2,310

192.50

6

Meghalaya

1,033

86.08

7

Mizoram

1,615

134.58

8

Nagaland

4,530

377.50

9

Punjab

8,274

689.50

10

Rajasthan

4,862

405.17

11

Sikkim

440

36.67

12

Tripura

4,423

368.58

13

Uttarakhand

7,137

594.75

14

West Bengal

13,587

1132.25

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823321) Visitor Counter : 178