पंतप्रधान कार्यालय
डेन्मार्कची राणी मार्गरेट II यांनी पंतप्रधानांचे केले स्वागत
Posted On:
04 MAY 2022 12:44AM by PIB Mumbai
डेन्मार्कच्या राणी मार्गरेट द्वितीय यांनी आज कोपनहेगन येथील ऐतिहासिक अमालीनबोर्ग पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
डेन्मार्कच्या सिंहासनावर विराजमान झाल्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधानांनी राणीचा सन्मान केला.
अलिकडच्या वर्षांत भारत-डेन्मार्क संबंध, विशेषतः हरित धोरणात्मक भागीदारीमधील वाढत्या गतीबद्दल पंतप्रधानांनी त्यांना माहिती दिली.सामाजिक कार्याला पुढे नेण्याच्या डॅनिश राजघराण्याच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी राणीचे आभार मानले.
***
Jaydevi PS/SC /CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822495)
Visitor Counter : 258
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam