पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2022 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही नेत्यांनी परस्परांशी थेट चर्चा केल्यानंतर प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा झाली.
दोन्ही पंतप्रधानांनी भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चांमध्ये नूतनीकरणीय उर्जा विषयक सहकार्य, विशेषतः सागरकिनाऱ्यावरील पवनउर्जा आणि हरित हायड्रोजन, तसेच कौशल्यविकास, आरोग्य, नौवहन, पाणी प्रश्न आणि आर्क्टिक यांसह अनेक विषयांचा समावेश होता.
भारताच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी भारताला सकारात्मक योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कमधील कंपन्यांची प्रशंसा केली तर डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिकसेन यांनी भारतीय कंपन्यांच्या डेन्मार्कमधल्या सकारात्मक योगदानाचा ठळक उल्लेख केला.
दोन्ही देशांच्या जनतेदरम्यान विस्तारत असलेल्या संबंधांचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले आणि स्थलांतर तसेच प्रवासविषयक भागीदारीबाबतच्या स्वारस्य घोषणापत्राचे स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक तसेच जागतिक समस्यांबद्दलच्या दृष्टीकोनांचे आदानप्रदान देखील केले.
या बैठकीतील प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. ते येथे वाचता येईल.
या बैठकीदरम्यान झालेल्या करारांची यादी येथे वाचता येईल.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1822408)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam