आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.40 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 2.78 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 16,980

गेल्या 24 तासात 3.303 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.74%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61%

Posted On: 28 APR 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.40 कोटींहून अधिक (1,88,40,75,453) मात्रांचा टप्पा पार केला. 2,31,86,439 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.


16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 2.78 कोटींहून अधिक (2,78,64,432) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी  मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404967

2nd Dose

10014666

Precaution Dose

4755872

FLWs

1st Dose

18415401

2nd Dose

17536326

Precaution Dose

7495383

Age Group 12-14 years

1st Dose

27864432

2nd Dose

4986816

Age Group 15-18 years

1st Dose

58309299

2nd Dose

41899185

Age Group 18-44 years

1st Dose

555627071

2nd Dose

477100613

Precaution Dose

123173

Age Group 45-59 years

1st Dose

202904425

2nd Dose

187720783

Precaution Dose

441168

Over 60 years

1st Dose

126854070

2nd Dose

116948915

Precaution Dose

14672888

Precaution Dose

2,74,88,484

Total

1,88,40,75,453



भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 16,980 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे.


परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.74% इतका आहे. गेल्या 24 तासांत 2,563 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,25,28,126 इतकी झाली आहे.


गेल्या 24 तासात 3,303 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 



गेल्या 24 तासात एकूण 4,97,669 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.64 कोटी (83,64,71,748) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.66%. नोंदविण्यात आला आहे.

 ****

Sonal Tupe/Sonal Chavan 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820865) Visitor Counter : 198