आयुष मंत्रालय

जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेत महत्त्वाच्या आयुष उत्पादनांच्या श्रेणींमध्ये 9000 कोटी रुपयांच्या स्वारस्यपत्रे सादर

Posted On: 22 APR 2022 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2022

गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद 2022 मध्ये, 9000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची स्वारस्यपत्रे सादर झाल्याने एक इतिहास रचला गेला आहे. एफएमसीजी, वैद्यकीय मूल्य प्रवास (हील इन इंडिया), औषधे, तंत्रज्ञान आणि निदान तसेच शेतकरी व  कृषीक्षेत्राशी संबंधित उत्पादने या प्रमुख श्रेणींसाठी ही स्वारस्यपत्रे सादर झाली आहेत.

एफएमसीजी क्षेत्रासाठी 7000 कोटी रुपयांहून अधिक, वैद्यकीय मूल्य प्रवास क्षेत्रासाठी सुमारे 1000 कोटी रुपये, औषध क्षेत्रासाठी 345 कोटी, शेतकरी आणि कृषीक्षेत्राशी संबंधित उत्पादनांसाठी 300 कोटी तर तंत्रज्ञान आणि निदान क्षेत्रासाठी 60 कोटी रुपये मूल्याच्या गुंतवणुकीची हमी देण्यात आली आहे.

या परिषदेच्या उद्‌घाटनपर सत्रात 20 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

या कार्यक्रमात, केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद  आणि विविध मान्यताप्राप्त संशोधन संस्था यांच्या दरम्यान एकूण 12 सामंजस्य करार देखील करण्यात आले.

या शिखर परिषदेत  अमूल,डाबर, कामा आयुर्वेद, अॅकॉर्ड, आयुरवैद, नॅचरल रेमेडीज, अॅम्ब्रो फार्मा आणि पतंजली यांसह 30 हून अधिक एफएमसीजी कंपन्यांनी उत्साही सहभाग घेतला. या उपक्रमातून साडेपाच लाख रोजगार निर्माण होतील आणि त्यातून 76 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतील असा अंदाज आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनस्पती मंडळाच्या सौजन्याने शेतकरी गट आणि उद्योगांमध्ये 50 हून अधिक सामंजस्य करार झाले. या करारांमध्ये 6300 शेतकरी सहभागी झाले आहेत आणि या करारांच्या माध्यमातून 4.5 हजार मेट्रिक टन उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.

या परिषदेत अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको आणि फिलीपाईन्स या देशांतील संस्थांशी आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आले.

 

  

S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819095) Visitor Counter : 193