रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रिक वाहनांच्या सर्व दोषपूर्ण खेप मागे घेण्यासाठी कंपन्यांनी आगाऊ कार्यवाही करण्याच्या नितीन गडकरी यांच्या सूचना दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी आणि गुणवत्ता- केंद्रित मार्गदर्शक तत्त्वांसाठी तज्ञांची समिती केली स्थापन

Posted On: 22 APR 2022 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2022

गेल्या दोन महिन्यांत विजेवर चालणाऱ्या म्हणजेच  इलेक्ट्रिक दुचाकीच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटघटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गुरूवारी केलेल्या ट्विटच्या मालिकेत गडकरी म्हणाले की, कंपन्या वाहनांच्या सर्व दोषपूर्ण खेप  ताबडतोब परत मागे  घेण्यासाठी आगाऊ कार्यवाही करू शकतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजनांबाबत शिफारशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. अहवालाच्या आधारे थकबाकीदार कंपन्यांवर आवश्यक आदेश  आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे देखील लवकरच जारी केली जातील, असे त्यांनी सांगितले.
 
जर कोणतीही कंपनी त्यांच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा करत असल्याचे आढळून आले तर त्या कंपनीला  मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील, असे गडकरी यांनी सांगितले.


JPS/SC/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1819017) Visitor Counter : 178