पंतप्रधान कार्यालय

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल म. म. मिलन मुहम्मद शेहबाझ शरीफ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.

Posted On: 11 APR 2022 11:11PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल म. म. मिलन मुहम्मद शेहबाझ शरीफ यांचे अभिनंदन केले आहे . शांतता , स्थैर्य व दहशतमुक्त क्षेत्र ही भारताची अपेक्षा असून तसे झाल्यास दोन्ही देशांना आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करता येईल असे मोदी यांनी म्हटले आहे. 


पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे, 

“पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल म. म. मिलन मुहम्मद शेहबाझ शरीफ यांचे अभिनंदन. शांतता , स्थैर्य व दहशतमुक्त क्षेत्र ही भारताची अपेक्षा असून तसे झाल्यास दोन्ही देशांना आपल्या विकासावर  लक्ष केंद्रित करता येईल , तसेच आपल्या नागरिकांचे कल्याण व प्रगती सुनिश्चित करता येईल.”

***

Jaydevi PS/UR/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818933) Visitor Counter : 142