आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 186.90 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.50 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 12,340

गेल्या 24 तासात 2,067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.38%

Posted On: 20 APR 2022 9:22AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.90 (1,86,90,56,607)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,28,31,901 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.50 (2,50,83,940) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 2,11,000 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404482

2nd Dose

10009606

Precaution Dose

4630405

FLWs

1st Dose

18414509

2nd Dose

17527996

Precaution Dose

7203573

Age Group 12-14 years

1st Dose

25083940

2nd Dose

862840

Age Group 15-18 years

1st Dose

57970064

2nd Dose

40745861

Age Group 18-44 years

1st Dose

555342528

2nd Dose

473731551

Precaution Dose

46960

Age Group 45-59 years

1st Dose

202863074

2nd Dose

187006387

Precaution Dose

164040

Over 60 years

1st Dose

126823517

2nd Dose

116490199

Precaution Dose

13735075

Precaution Dose

2,57,80,053

Total

1,86,90,56,607

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 12,340  इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या  एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 1,547 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,13,248 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,21,183  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.29 (83,29,27,938)   कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.38% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.49% आहे.

****

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818307) Visitor Counter : 228