आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 186.72 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.47 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,860

गेल्या 24 तासात 1,247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.34%

Posted On: 19 APR 2022 9:36AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.72 (1,86,72,15,865) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,27,79,246 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2.47 (2,47,06,692) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत नागरिकांना खबरदारीच्या 1,85,860 मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404423

2nd Dose

10009004

Precaution Dose

4614590

FLWs

1st Dose

18414423

2nd Dose

17527063

Precaution Dose

7174576

Age Group 12-14 years

1st Dose

24706692

2nd Dose

469519

Age Group 15-18 years

1st Dose

57928041

2nd Dose

40600205

Age Group 18-44 years

1st Dose

555304803

2nd Dose

473277032

Precaution Dose

41778

Age Group 45-59 years

1st Dose

202857576

2nd Dose

186912781

Precaution Dose

144082

Over 60 years

1st Dose

126818941

2nd Dose

116427786

Precaution Dose

13582550

Precaution Dose

2,55,57,576

Total

1,86,72,15,865

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,860 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासात 928 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,11,701 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 1,247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासात एकूण 4,01,909 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.25 (83,25,06,755) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.34% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.31% आहे.

****

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817957) Visitor Counter : 189