आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 185.74 कोटी मात्रांचा टप्पा केला पार 12- 14 वयोगटातल्या मुलांना 2कोटी 22 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
भारतामध्ये सध्या कोविड सक्रिय रूग्णसंखया 11,058 आहे.
गेल्या 24 तासात 861 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.76%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23 %
Posted On:
11 APR 2022 9:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली – दि.11 एप्रिल, 2022
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 185 कोटी 70 लाख (1,85,70,71,655) मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशभरामध्ये 2,24,81,173 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2 कोटी 22लाखांपेक्षा अधिक (2,22 ,67,519) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे कालपासून म्हणजेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी 9,674 जणांना क्षमता वृद्धी मात्रा देण्यात आली.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे.
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,04,105
|
2nd Dose
|
1,00,05,229
|
Precaution Dose
|
45,37,825
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,13,930
|
2nd Dose
|
1,75,20,810
|
Precaution Dose
|
70,14,334
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
2,22,67,519
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,76,51,525
|
2nd Dose
|
3,96,08,886
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,50,52,829
|
2nd Dose
|
47,02,19,979
|
Precaution Dose
|
2,557
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,28,21,273
|
2nd Dose
|
18,62,87,235
|
Precaution Dose
|
7,117
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,67,92,219
|
2nd Dose
|
11,60,30,268
|
Precaution Dose
|
1,27,81,187
|
Precaution Dose
|
2,43,43,020
|
Total
|
1,85,74,18,827
|
गेल्या 24 तासांत भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.76 % इतका आहे. 929 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,25,03,383 झाली आहे.
गेल्या 24 तासात 861 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांमध्ये कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,71,211 चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत भारतामध्ये एकूण 79.41 कोटींपेक्षा जास्त (79,41,18,951) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.32% इतका नोंदला गेला आहे.
***
Jaydevi PS/SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815581)
Visitor Counter : 232