अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूली तूट भरून देण्यासाठी 14 राज्यांना 7183.42 कोटी रुपये जारी


राज्यांना 2022-23 मध्ये महसूली तुट भरून काढण्यासाठी आतापर्यंत मिळाले 86,201 कोटी रुपये

Posted On: 08 APR 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने, काल 14 राज्यांना महसुली तूट भरून काढण्यासाठीच्या (पीडीआरडी) अनुदानाचा पहिला  मासिक निधी म्हणून, 7,183.42 कोटी रुपये जारी केले.

पंधराव्या वित्त आयोगाने, आर्थिक वर्ष 2022-23 मधे या अनुदानापोटी 14 राज्यांना 86,201 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस केली आहे. शिफारस केलेले अनुदान व्यय विभागाकडून शिफारस केलेल्या राज्यांना 12 समान मासिक हप्त्यांमध्ये जारी केले जाईल.

राज्यघटनेच्या कलम 275 अंतर्गत, राज्यांना हे विचलनानंतरचे (पोस्ट डिवोल्युशन ) महसुली अनुदान दिले जाते. जेणेकरुन, राज्यांना, महसूलात आलेली तूट भरून काढता येईल.

हे अनुदान मिळण्यासाठी, राज्यांची पात्रता आणि 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी अनुदानाचे प्रमाण किती असावे हे राज्याच्या महसूल आणि खर्चाच्या मूल्यांकनातील तफावतीच्या आधारे पंधराव्या वित्त आयोगाने निश्चित केले आहे.  

आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि  पश्चिम बंगाल या राज्यांना 2022-23 या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाने महसूल तूट भरुन देण्यासाठी अनुदानाची शिफारस केली आहे

2022-23 साठी शिफारस केलेल्या विचलनानंतरच्या (पोस्ट डिवोल्युशन) महसुली अनुदानाचा राज्यवार तपशील आणि राज्यांना पहिला हप्ता म्हणून जारी केलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे:

राज्यनिहाय विचलनानंतरचे (पोस्ट डिवोल्युशन ) महसुली अनुदान (पीडीआरडीजी) जारी केले

(रुपये कोटीमध्ये)

S.No.

Name of State

PDRDG recommended by FC-XV for the year 2022-23.

1st instalment released for the month of  April, 2022.

1

Andhra Pradesh

10,549

879.08

2

Assam

4,890

407.50

3

Himachal Pradesh

9,377

781.42

4

Kerala

13,174

1097.83

5

Manipur

2,310

192.50

6

Meghalaya

1,033

86.08

7

Mizoram

1,615

134.58

8

Nagaland

4,530

377.50

9

Punjab

8,274

689.50

10

Rajasthan

4,862

405.17

11

Sikkim

440

36.67

12

Tripura

4,423

368.58

13

Uttarakhand

7,137

594.75

14

West Bengal

13,587

1132.25

 


S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814837) Visitor Counter : 214