रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मोटार वाहनांची योग्यता तपासणी स्वयंचलित चाचणी केंद्रांच्या माध्यमातून करणे अनिवार्य करण्यासंदर्भात अधिसूचना जारी
प्रविष्टि तिथि:
07 APR 2022 11:21AM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व मोटार वाहनांची योग्यता तपासणी केवळ केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत 175 व्या नियमातील तरतुदीनुसार स्वयंचलित चाचणी केंद्रांच्या माध्यमातूनच केली जाणे अनिवार्य करण्यासंदर्भात 5 एप्रिल 2022 रोजी खालीलप्रमाणे अधिसूचना जारी केली आहे-
- अवजड प्रकारची मालवाहतूक करणारी आणि प्रवासी वाहने यांच्यासाठी 01 एप्रिल 2023 पासून ही चाचणी अनिवार्य, आणि
- मध्यम प्रकारच्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांसाठी तसेच हलक्या प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोटार वाहनांसाठी ही चाचणी 01 जून 2024 पासून अनिवार्य असेल.
यासंदर्भातील लिंकसाठी कृपया येथे क्लिक करा
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1814412)
आगंतुक पटल : 267